मी ठरवलंय

मी ठरवलंय
दूर उडायच
खुप दुर, अगदी क्षितिजापलीकडे
जेथे असेल
माझीच जमिन
अन माझाच आसंमन्त
नसेल तेथे कोणाचे बंधन
ना कोणत्या बंधांचे पाश
असेल फ़क्त
मी,मी आणि
माझाच मी
पण मन थोडे घाबरते
स्व:ताशीच विचारते
तू राहू शकशील
एकटाच,
संसारतील शापीत बंधनाशीवाय
आईच्या प्रेमळ मायेशीवाय
अन
प्रियतमेच्या नजरेतील
धुंदी पाशाशिवाय