राहून गेलेल्या गोष्टी

"स्वप्न" माणस रोजच बघतात.... रोज काय... प्रत्येक मिनिटाला बघतात. काही स्वप्न हवेत विरून जातात... काही थोडावेळ आठवणीत राहतात तर काही आपण कितीही मोठे झालो तरी तशीच मनाच्या तळाशी राहतात.
स्वप्न अक्षरश: काहीही असतात. शाळेत असताना मोठेपणाची स्वप्न.... मोठेपणी "लहनपण देगा देवा! " आपल्या प्रत्येकात एक मुंगेरीला लपालेला असतोच.
अगदी लहांपणापसून असेच काही स्वप्न माझ्या मनात आहेत. काही अगदी एव्हड्यत पूर्ण झालीत आणि काही अजूनही तशीच आहेत.

"व्हिडिओकोच" गाड्या जेव्हा बाजारात आल्या तेव्हा एक क्रेज निर्माण झाली होती. बस मध्ये बसून मास्त सिनेमा पाहायचा! हे माझ पहिला स्वप्न. पण "सकाळ" मधल्या चिंटू सारख कितीही प्रकारे प्रयत्न केले तरी "पिल्लू पळयचे नाही" हे अटळ, तस प्रवास हा लाल गाडितुनच चांगला आसं आमच होत!

पण एकदा अथक प्रयत्ना नंतर बाबा तयार झाले.... आम्ही गाडीत बसलो... आता चलू होइल, मग चलू होइल... पण पट्ठ्या चालुच होइना! मला अस्वस्थता सहन होइना... तडक चालकाकडे गेलो...

"टि. वी. बंद आहे साहेब! "

त्यानंतर किमान ८ वेळा मी बस मध्ये बसून टि. वी. बघायचा प्रयत्न केला... पण एकदाही टि. वि. चालू नव्हता. मला तर ह्या बसवाल्यांना बदडायची संधी कधी मिळते आहे अस झालं. पण परवाच हे स्वप्न पूर्ण झाल... नेहेमी प्रमणे "अपेक्शा वाढल्या की दूःख जास्त होतं" हा निखिलानंदांनी माडलेला सिद्धांत डोळ्यासमोर ठेउन बस मध्ये बसलो. पुस्तक चाळत असताना कोणीतरी किंचाळलं.. म्हणून बघीतल तर चक्क बस मधल्या टि. वी. तून एक बाई किंचाळत होती. हुह...

कालंतरानी स्वप्नाच्या संखेत वाढ होत गेली... मग माला रेल्वेच्या इंजीन मध्ये बसून शीट्टी वाजवायची स्वप्न पडयला लागली. "रेल्वेची शीट्टी कशी दिसत असेल? "... "ड्रायव्हर काका ती तोंडानी हवा सोडून वाजवीत असतील का त्याचं बटण असेल? ".... "एव्हडा मोठा आवाज आहे म्हणजे खुप मोठी असेल शीट्टी! ".... माझे नाना प्रश्न आईला डोक्याला हात लावायला भाग पाडायचे. कित्येकदा तर रेल्वेचा विषय काढला की "अभ्यास कुठपर्यंत आला आहे? परिक्शा जवळ आली आहे" असे वाक्य ऐकावे लागयचे.

ही इच्छा मत्र अजुनही पुर्ण झालेली नाही! "पण एकदातरी मी रेल्वे ईंजीन मध्ये घुसून शीट्टी वाजवेनच! " असा मी चंग बांधला आहे.

मघाशी म्हणालो तस कालांतरानी स्वप्नांच्या संख्येत जशी वाढ झाली तशी स्वप्नांच्या विषयातही बदल झाले. काय आहे... आपल्याकडे सिनेमेवाले काहीबाही दाखवतात... आणि आमच्यासारखे वेडे स्वप्न रंगवायला लागतात. "बस मध्ये शेजारी एक छानशी मुलगी बसावी! " हे माझ अलीकडच स्वप्न. नासिकहून पुण्याला आल्यावर ह्या स्वप्नानी तर अजुनच जोर धरला आहे. इथे सिनेमेवाले तर कहीबाही दाखवतातच पण रस्त्यानी येता जाताही खूप काही बघायला मिळत! असो... नो कमेंटस!

जेव्हापासून हे स्वप्न पाहील तेव्हापासून कदाचीत ते माझ्या चेहेऱ्यावर कोरल गेलं आहे. माझ्या शेजारी कोण बसणार तर वयस्कर आजी, एका हातनी फेटा आणि दुसऱ्याहातनी पिशवी संभाळत (की माझ्या बरगड्यांमध्ये घुसवत) बसणारे आजोबा... आणि हो.. चेहेऱ्यावर मोठा काळा मस आणि तितकाच काळा चेहेरा असणाऱ्या लोकांचा तर मी फेव्हरेट आहे! अस कोणी आत शीरलं की मी कुठे बसलो आहे हे मला सांगावेच लागत नाही... त्यान्ना मी बरोब्बर सापडतो. दाढी वाढवून पाहीली... फ्रेंच बीयर्ड वगेरे... दाढी काढून पाहिली... पण काही उपयोग नाही. खुदा करे बीवी तो खुबसूरत हो!