माझ्या लाडक्या मैत्रिणी

माझ्या लाडक्या मैत्रिणी
येतेस का फिरायला
हातात हात घालून
बागेतली फुले वेचायला

माझ्या लाडक्या मैत्रिणी
येतेस का चंद्रावर
दिसेल बघ तुला तिथून
बाप्पा बसलेला उंदरावर

माझ्या लाडक्या मैत्रिणी
थोड ऐकशील का
आई दिसली रस्त्यात तर
गोड हसशील का

माझ्या लाडक्या मैत्रिणी
नको देऊस ग त्रास
रोज रोज स्वप्न तर पडतातच
आणि जागेपणी पण होतात भास

माझ्या लाडक्या मैत्रिणी
नको ग अशी रूसू
पुढच्या पौर्णिमेच्या चांदण्यात
नक्की मिठी मारून बसू

माझ्या लाडक्या मैत्रिणी
नको धावू अशी वेगात
तुझा हा वेग बघून
हृदय धडकते जोरात

माझ्या लाडक्या मैत्रिणी
नको ग चिडू
तुला चिडलेली बघून
मला उगा येते रडू

माझ्या लाडक्या मैत्रिणी
घरी देत नाहीत तुला चहा
माझ्या कडे बसून मस्त
कॉफी सोबत टीव्ही पाहा

माझ्या लाडक्या मैत्रिणी
झाली आहेस तू मावशी
लाडक्या भाचीची दोस्ती करून दे
चिऊशी आणि काऊशी