माया

मी बाळ होतो जेव्हा - लई ग्वाड पोर होतो

मी बाळ्या झालो तेव्हा - लई द्वाड झालो होतो

मी बाळू झालो तेव्हा - आडदांड वाढलो होतो

अन बाळोबा झालो तेव्हा - लांडगा रांडिचा बनलो

मी ब्राण्डीकिंग झालो तेव्हा - बाळाशेठ बनलो होतो

अन जननेता झालो तेव्हा - साहेब स्वयंभू ठरलो

मी बाळ होतो जेव्हा-

लालमातिच्या अंगणातुनी - यथेच्छ रांगलो होतो

मी साहेब बनलो तेव्हा-

लालबत्तिच्या गाडीत बसुनी -  लाल रजलोट उडवीत होतो

मी बाळ होतो जेव्हा - साऱ्यांनी माया केली

मी साहेब बनलो तेव्हा - असीम माया गोळा झाली !