कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या "उठा उठा चिऊताई"चे विडंबन
"झोपा झोपा चिऊताई"
झोपा झोपा चिऊताई
आहे जरी उजाडले
ठेवा डोळे मिटलेले
अशातही.
कठीण हे दिन आले
दिवसाही रात्र जशी
डोळ्यांवर झोप कशी
तशांतही.
आपलीच पाखरे ही
शत्रूंचेच त्यांचे बाणे
उडविती बघा दाणे
कशांतही.
एवढ्याश्या ताई तुम्ही
आणि शत्रूंचा हा मारा
वाचाणार कसा चारा
तुमचाही.
कुणाचे ना घेता नाव
झोपी गेली चिऊताई
साऱ्या पिल्लांसवे बाई
त्या तिच्याही...........
प्रज्ञा महाजन (३१-०७-२००९)