टॅक्सीवाल्या भय्यांची

मित्रांनो

आज बर्याच दिवसांनी मनोगती विडंबन लिहावेसे वाटले... शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, त्यावरून सुचले - गोड मानून घ्या!

टॅक्सीवाल्या भय्यांची परवा भरली सभा
बोलत होता सभापती - टपावर उभा

जोरात म्हणाला, जोरात म्हणाला भय्यांनो,
भाड्यामधली लूट, भाड्यामधली लूट
आपल्या भाडेकरूंना लावून शेपूट
ह्या लुटींचे प्रकार काय?

भोलू म्हणाल भोलू म्हणाला
येता जाता भाड्याला मी मारीन बाता

लालू म्हणाला, लालू म्हणाला
ह्याला ठगीन, त्याला ठगीन
मी माझ्या भाड्याला पुरते धुवीन!

ठाकूर म्हणाला, ठाकूर म्हणाला
टॅक्सीत येईल त्याला
नुसताच घुमवीत राहीन

ललवा म्हणाला, ललवा म्हणाला
ठाकूरसारखे माझे मुळीच नाही
खूपखूप फिरवीन आणि मगच सोडीन

यादव म्हणाले, यादव म्हणाले
माझे काय?
गिर्हाईक म्हणजे घरची गाय!!

 - मंदार, ऑगस्ट १, २००९