गोष्ट एका पावसाची.

गोष्ट एका पावसाची,

दोन जीवांच्या प्रीतीची.

गोष्ट एका पावसाची,

चिमुकल्या कागदी होडीची.

गोष्ट एका पावसाची,

ओले-चिंब होण्याची.

गोष्ट एका पावसाची,

गरमा-गरम कांदा भजी आणि चहाची.

गोष्ट एका पावसाची,

बेभान प्रलयाची.

गोष्ट एका पावसाची,

निष्पाप उध्व्स्त आयुष्यांची.

विसरू म्हणावं तरी विसरता येत नाही,

अशी हि गोष्ट एका पावसाची,

गोष्ट एका पावसाची!!!