हारले आयुष्यात जेव्हा केव्हा,
जगण्याचा दिलासा तुच होतास.
अडखळली कित्येक मनोगते माझी,
एक निर्भिड शब्द माझा तुच होतास.
नाते कोठले हे मनमनाचे,
अंतरी आरपार माझ्या तुच होतास.
सांग खोट कोणती नात्यात या,
शाश्वत सत्य माझे तुच होतास.
कोपर्यात आसवे ढाळताना,
मिश्किल हासु माझे तुच होतास.
भांडण जगाशी होत जाऊ दे रे,
माझ्यासाठी वाद माझा तुच होतास.
(शरण तुजवाचुन मी न कुणा,
असा पंढरी माझा तुच होतास.)