आजची सकाळ लांबच लांब जास्त का भासते?
काहूर मनी झटकलेले उगीच पुन्हा का दाटते?
ओरडून मोठ मोठ्याने जरी पुकारलेस तिला
क्षितिजा पलीकडे हाक हि का जात नसते?
हात रेशमी राखीने भरलेले येथे गरीब श्रीमंत सर्वांचे
भोंडे हात माझे डोळ्यांनी ती क्षितिजाच्या का पाहत नसते?