तू आणि मी

तू आणि मी

गोदाकाठी

आपण दोघे

तू आणि मी.

     संथ नदी

     निळंशार पाणी

     नदीतीरी मंदिर

     मंदिरात घंटा

     घंटेचा मंजुळ ध्वनी

     आणि ...

     तुझी चाललेली 'किलबिल'.

शांत हवा

हवेची झुळूक

तुझी साथ

आणि...

मोहिनी घालणारं

तुझं निखळ हास्य.

     त्या हास्यात

     मी मला विसरलेलो...

आता...

आता सारं सारं बदललंय...

     नदी अडलीय,

     पाणी सडलंय,

     मंदिर पदलंय...

     त्या नदीकाठी

     आता प्रेतांचाच खच.

     प्रत्येक प्रेत

     जळण्याची वाट बघतंय,

     सरण कमी पडलंय... !

     अजून किती वेळ...

     कुणास ठाऊक !

     काही प्रेतं सडताहेत...

     त्यातच एक

     माझंही.