हीच इच्छा

हीच इच्छा

तुझ्यासाठी जगावं

तुझ्यासाठी मरावं

माझं मन

तुझ्यासाठी उरावं

     तुझ्याविना माझं

     जीवन व्हावं भेसूर,

     नशिबी असावा वनवास

     त्यातही असावे असुर

तुझ्यासाठी मी

भटकत जावं वनोवनी

नित्य तुझ्या आठवणी

असाव्या माझ्या मनोमनी