जगण्याची ओझी मी स्वतः उचलायची;
पण मी कसे जगायचे हे परकेच ठरवायचे.
पाहिली मी राख होता स्वतःच्याच स्वप्नांची;
वाट त्याची पाहिली जे कधी नव्हतेच माझे .
लोक भेटायचे मला रोज हे अनोळखी;
रोज नवा भावनांचा बाजार ते मांडायचे;
खेळताना शब्दखेळी आपल्या मनासारखी;
मी नव्याने हसावे अशी अपेक्षा ते करायचे.
काय होती माझ्याकडून अपेक्षा या माणसांचि;
विचारून प्रश्न मनी मी कोलमडून जायचे;
घाव वर्मी पडायचे माझ्याच काळजावरि;
पाश मी माझेच सारे तेव्हा त्यावरी पांघरायचे.
खेद वाटतो आम्हा दुःख तुला दिले आम्ही;
लोक तेच असायचे पण शब्द असे बदलायचे;
सहज विसरुन जातिल ते वागलो आपण जे;
माझे गेलेले दिवस ते परतून कधी न यायचे.
आठवता भुतकाळ्यातल्या सुखद त्या आठवनि;
व्हायचे अलगद दुर सावट दाटलेल्या निशेचे;
जगून पाहव वाटायच पुन्हा करून सुरुवात नवि;
घायाळ मन माझे बिचारे कुठेतरी दचकायचे;