उद्वेग

जो मजला भावला
मानले मी मित्र त्याला
परि ना कधी कुणा
शत्रुसम मी मानला ॥

नाही कधी कुणाची
अल्पही केली उपेक्षा
चार मधुर शब्दांची
होती परी अपेक्षा ॥

संकोच नव्हताच कधी
मनातले ते सांगावया
नव्हते झाकावया कांही
जे शरमिंदे करील कुणा ॥

कां तरी माझा खरेपणा
न भावे इतरां कुणा?
कां त्यांनी सरळ शब्दांचा
अर्थ घ्यावा वावगा? ॥

काय काजव्यांचे चमकणे
खोटेच ते म्हणायचे?
रामप्रहरीच्या दंवाचे
अस्तित्व नाकारायचे? ॥