सात्त्विकता

देवळात रोज जाताना
तेच तेच चेहरे दिसतात
सात्त्विकता जपणारे जर हे
तर बाकीचे काय मरत असतात?

         बसलेला पायरीवरचा भिकारी
         पायरी सांभाळून भीक मागतो
         नित्यनैमित्तिक देवळात जाऊन
         कोणती सावकारी हे करत असतात?
 

पोटाला काही द्या म्हणणाऱ्यावर
चले चाल ! खेकसत असतात
न खाणारा प्रसाद म्हणून
समोर पेढे धरत असतात 

          न खाणाऱ्याला देव माणुस म्हणता
          नक्किच कळलं हे आता बुवा
         खाऊन खाऊन लोकांपुढे
         देवळात रोज मरत असतात.