स्यांडविचभजी

  • लहान कांद्याच्या, काकडीच्या व टोम्याटोच्या पातळ चकत्या, लसूण-पुदिना-कोथिंबीर पेस्ट, बेसन, तेल
  • लोणच्याचा खार (तोंडी लावायला). तिखट, मीठ, ओवा इत्यादी.
३० मिनिटे
चार व्यक्तींसाठी

एका रविवारी पत्नीला कंटाळा आला होता. मुलांनाही कांहीतरी नवा पदार्थ खावासा वाटत होता. घरात हुडके घेतले. जे जिन्नस मिळाले, त्यातून स्यांडविच-भजी तयार केली.

प्रथम लहान कांद्याच्या व लहान टोम्याटोच्या चकत्या करून ठेवल्या. पुदिना-कोथिंबीर-लसूण-मिरची पेस्ट करून घेतली.
ब्रेडच्या एका स्लाईसचे सारखे चार तुकडे करून घेतले. प्रत्येक तुकड्याला स्यांडविचप्रमाणे तयार पेस्ट लावून एक-एक कांदा-टोम्याटो-काकडीच्या चकत्या ठेवून त्यावर ब्रेडचा दुसरा चतकोर तुकडा दाबला. असे सोळा जोडतुकडे करून ठेवले. तेल तापत ठेवले. पुरेसे बेसन घेऊन त्यात चवीपुरते तिखट-मीठ-ओवा घालून घट्टस भिजवल्यानंतर तयार मिनि-स्यांडविचचे तुकड्यांना वरून ते पातळ बेसन लावून तापलेल्या तेलात भज्याप्रमाणे तळून घेतले. काकडीच्या चकत्या ज्याला पाहिजे होत्या, त्यांनी वेगळ्या घेतल्या. लोणच्याचा खाराबरोबर गरम-गरम ही स्यांडविचभजी मस्त लागली.

ही पाककृती फक्त पुरुषांनी मन लावून करावी. स्वतःचे अधिकचे कौशल्य जरूर वापरावे.

स्वतःची पाककृती