आकाशाची शांत निळाई आणि धरेची छाया
देशासाठी, धर्मासाठी, सदा झिजू दे काया
देशभक्ताच्या कुलातजन्मला, तू माझा राया
खुषीत राहीन तवसंगे, बनूनी रे तव जाया
आधारस्तंभ बन धर्माचा,कर धर्मावरी माया
दाखव धर्मनिष्ठा तू, बनुनी संभाजीची काया
लचके तोडती धर्माचे, करुनी शत्रू रे म्रुगया
वाचवून धर्मास तू, दाखव तुझीच किमया
देशप्रेमाची उर्मी असावी, सदा तुझ्या हृदया
टिपून देशद्रोह्यांना, लिलेने करसी तू म्रुगया
मुक्त करसी जातियतेतून, या देशास सार्या
अभिमान वाटेल तेंव्हा मज तूच माझा राया
दाखव मार्ग नवपिढीस आज भरकटलेल्या
पल्लवित होतील आशा, विझून गेलेल्या
लढण्यास न्यायासाठी, शक्ती देवो प्रभुराया
विनंती आहे प्रभूस, करो तुजवर क्रुपाछाया