भरारी

घे रे भरारी, उंच पाखरा
भव्य निळसर या अंबरात
विहर मुक्तपणे गगनात
दाखवुनी तुझा तोरा......
पंखात बळ आहे जोवरी
अंगात उर्मी आहे तोवरी
उडवुनी दाखव जोरा........
येतील अडचणी अनेक
कर मात त्यावर प्रत्येक
पाहुनी वाहे कसा वारा.....
पाळत असेल ती  तुजवर
पारधी टिपतील जाळ्यावर
चुकवुनी त्यांच्या नजरा...
दिसेल जग सुंदरवेगळे
सुंदर कुरणे, झाडावर फळे
खाऊनी झाडावरील चारा...
फसू नकोस मोहाच्या क्शणी
गमावू नकोस स्वातंत्र्य झणी
अमूल्य असे स्वातंत्र्य पाखरा..