पाहिली जंगलात झाडे फार
वाढली दाटीत, तोलती भार
स्पर्धा मिळवण्या रविप्रकाश
वाढती ढकलून एकदुसऱ्यास
होते तयात हो अनेक प्रकार
कृश, स्थूल, खुजे, उंच फार
वादळ , पावसाच्या संकटात
करती सामना ते एकजात
स्थिरावले, टिकले संघर्षात
पडले दुबळे, मात्र क्षणार्धात
न्याय जगाचा, जो बलवान
लाभे त्यास,स्थैर्यता,जीवन
न्याय लागे, का मानवाला
निसर्ग विचारे, मम मनाला