आकाश-
व्याप्ती
असीम
आधार
आधाराचा
क्रीडांगण
ग्रहताऱ्यांचे
चमचम
अनुपम
रंगमंच
देवेंद्राचा
झळाळ
वज्राचा
मेळ
सप्तरंगाचा
तरीही
निर्लेप !
आकाश-
सोसणूक
सह्स्त्रसौरतापाची
पाझर
अमृताचा
दान
अनोखं
संजीवन
मृद्कणांना
तरीही
निरहंकार !
रे मना,
असो
उभारी
उमेद
नवी
शोधाया
क्षितिज
नवे
घेऊ
भरारी
उत्तुंग
आकाशगर्भी
डुंबाया
मनसोक्त
शाश्वत
हिरण्यप्रकाशी ॥