ग्रीष्म संपला, आर्द्रा नक्षत्रही सरले
काय झाले कळेना, वरुणराज का रुसले?
जलाशय सुकले,आटल्या विहिरी,सरिता
व्याकुळली धरती, प्राणी, ते पाण्याकरता
पाण्यासाठी वणवण फिरे, प्राणी, मानव
दृष्टीस न पडे, पाण्याची विहिर, तलाव
नसे जल जंगलात पिण्यास ते श्वापदास
सोडून जंगल शोध घेती, जलाचा वस्तीस
हताश ते कृशिवल, आसवे येती नयनात
लांबल्या पेरण्या शेतात, वेध घेती नभात
रोज रोज येती काळे घन, असे हे नभात
हुलकावणी देती, निघून जाती तरंगत
पडे ना पाऊस, जातात नभ तोरा मिरवत
काय अपराध असे, रुसला बरुण मनांत
आहे पुण्यनगरी, भूमी थोर थोर संतांची
कृपाळू वरुणा, कर बरसात पर्ज्यन्याची