पुणेरी वाहतूक

पुणेरी वाहतूक

वाहतुकीचे नियम आज सर्वच पाळीत होते ।

लाल दिवा लागताच सर्व तत्काळ थांबत होते ।।

कुणी करीत नव्हते पुढे जाण्याची घाई।

आज सर्वच वाटत होते मला मुन्नाभाई ।।

रस्ता ओलांडताना पादचारी निवांत चालत होते ।

कुठलेही वाहनचालक पांढऱ्या रेषेवर दिसत नव्हते ।।

कुठलाही नियम येवो त्याचा पुण्यात होई बट्ट्याबोळ ।

रस्ते दुरुस्तीचा तर नेहमीच चालत असतो घोळ ।।

पुण्यात वाहन चालवणे म्हणजे एक दिव्यच असते ।

प्राण मुठीत ठेवून तुम्हाला सावकाश जावे लागते ।।

आज हे सौजन्य बघून मी गेलो होतो हरकून ।

कुठल्याश्या मोठ्या आवाजाने जागा झालो खडबडून ।।

तेव्हा कळले मला हे होते स्वप्न मधुर ।

आता पुन्हा वाहन चालवताना "होतो मी चिंतातूर"।।

- अनंत खोंडे

१८ ऑगस्ट २००९