गणपतीची आरती

जयदेव  जयदेव  जय  गणराया
कृपावंत व्हावे,पडतो तुमच्या पाया

कऱ्हेच्या तीरावर,मोरेश्वराचा वास
इच्छापूर्ती करी, भक्तास पावे खास ..१

सिद्धेश्वराचा मुक्काम, हा भीमेकाठी
मनोभावे पूजता,त्यांच्या असे पाठी...२

बल्लाळेश्वराचा महिमा,असे हो पाली
दर्शनास जाती, त्यांचा असे तो वाली...३

मढ  गावाजवळ, असे  वरदविनायक
अभय देत असे, भक्तास त्या प्रत्येक...४

चिंतामणी थेऊरचा,असे खूप जागृत
नवस करता त्यास ,देई फळ अमृत...५

डोंगरावर बसला, असे गिरीजात्मक
पृथ्वीप्रदक्षणेचे पुण्य,मिळे आत्मिक...६

विघ्नेश्वराचे, वास्तव्य असे ओझरी
नाश करे संकटाचा, भाव धरा  उरी...७

रांजणगावाला महागणपती स्थान
दर्शन घेता होई, लक्ष्मीकृपा, मान...८