सोडून जात असताना
माघे वळून पाहत होती
नयनात होते अश्रू ओले
मनी उगी तरी राहत होती
देह ओढत होते पाय
पोटही हालवत होते पाय
पळे दूर क्षणो क्षणी
मनी तेथे राहत होती
संपली वेस गावाची
नदीतिरी फरफटत होती
घराच्या ओट्यावर दिसेल
नजरेने ती पाहत होती
सोडला तीर सोडली वेस
वेगाने पाय दामटत होती
माघे पडलेल्या छोटीसाठी
मनो मनी रडत होती