तुझाच वेडा

तू रडतेस तेव्हा तुझ्या डोळ्यातल्या पाण्याला;

सोबत म्हणून माझेही डोळे रडतात;

कारण तुझ्या प्रत्येक सुखदुःखात;

साथ द्यायची हे ठरवलंय ना मी;

नाही चुकलो तुला वचनच दिलंय मी;

तुझ्या पाउलावर पाऊल ठेवून सप्तपदी चालताना;

आपण तर बुवा ठरवलंय;

माझ्या दुःखात तुला नाही गुंतवायचं;

कारण तू जवळ असल्यावर;

ते बिचारं माझ्या वाटेला कधीच नाही जायचं;

काय हा वेडेपणा म्हणून तू खुदकन हसशील;

तुझाच आहे मी म्हणून मनातल्या मनात;

परमेश्वराचे आभार मानशील;

पण मी म्हणतो अस वेडेपणा करावा कधीतरी;

रडणाऱ्या आपल्या माणसाला आयुष्यभर हसवण्यासाठी.