साठवण
=============
.
.
उंटाच्या पाठीवर
पिऊचा साठा,
दिसे प्राणी वाकडा
दुरूनी पाहता.
वाळवंटी जीवाला
सुकर वाकडेपणा
पाण्यासाठी
पाणोठ्याकाठी
माणूसही वसला,
आडवावे.. जिरवावे..
साठवणीचा महीमा...!
.
माकडाच्या गालात
फळांच्चा तोबरा,
भासे प्राणी लुबरा
दुरूनी पहाता.
आता आहे मग नाही
ज्याला त्याला धोसरा;
तहानेसाठी धरणं तळी
घासासाठी कणगी कोठी
ज्ञानासाठी ग्रंथ पोथी
माणूस झाला रचेता...!
.
स्वभावतः मुंगीच्या वाट्या
चातुर्वर्ण्याचा वाटा,
नाही त्रास नाही त्रागा
अंतः प्रेरणेने राबता.
एक- एक अनेक हात
साथ सोबत राबता
राईचा जीव झाला
पर्वत बांधता.
" साथी हाथ बढाना"
झाला माणूस गाता...!
.
आसक्तीची सक्ती झाली
सांगावे कोणा..?
साठवण येते कामा
अडल्या नडल्या वेळा.
थकल्या दमल्या जीवा
स्नेह देई उभारा
सुखाचं बालपण
माणसाच्या पिलाला.
आश्वासक संध्याकाल
माणसाच्या वार्धक्याला...!
.
.
=============
स्वाती फडणीस
२०-०८-२००९