पुण्यातील रस्ते

शहरात पुण्याच्या, असती रस्ते अनेक
कमनशिबी असे, मात्र त्यातील प्रत्येक

येताच मोठीशी,पावसाची जोरदार  सर
वाहून जाई,वाळू, सिमेंटचा रस्ता स्तर

पडती रस्त्यावर ते, खळगे खोल  थोर
मुष्किल होई चालणे, तारांबळ ती फार

भरती पाण्याने, तुडुंब खळगे ते महान
अंदाज येत नसे, खोलीचा त्या  गहन

लहान, मोठे, उथळ, खोल  असे प्रकार
अपघात होई वहानास,असे वेगात फार

झाले असती रस्ते, अनाथ कसे बिचारे
दुरुस्ती करण्यास, पालिका न  विचारे

येई कोणी सधन, दत्तक घेई,रस्त्यास
करे खर्च स्वतः,बनवे गुळगुळीत खास

बसवे पथकर, करती त्याचा जे वापर
देई जनता कर, वाचे त्यांचा त्रास फार