भिकारी

देवळाबाहेर त्या पायरीवर;

लक्तरे ती माझीच होती;

पण भक्तांच्या या खोगिरभरतीत;

माझी कुठेच गणती नव्हती.

तेवढीच ति लक्तरे;

त्या देवाने मला दिली;

कशी झाली चूक म्हणून;

कदाचित त्याच्याही डोळा असेल पाणी.

लोक घालायचे भीक मला ;

समजून गरीब बिचारा;

सहानुभूतीच्या नावाखाली;

पुण्य विकत घ्यायचा बहाणा.

काय माझ्या जीवनाची;

हि असे शोकांतिका;

मला दिलेल्या दानतीवर ठरणार

 त्यांच्या आयुष्याची सुखांतिका.

पण या प्रदर्शनातल्या श्रीमंतिपेक्षा;

मला माझीच गरिबी मोठी वाटते;

कारण माझी फाटकी झोळीसुद्धा;

वेळेला सोबत्यांची भूक भागवते.

माझंही वाढेल पुण्य या दानाने;

कर्णाचा दाता होईन मी;

सहानुभूतीने पाहणाऱ्यांचीच;

क्षणभर कीव करेन मी.