आपुला नेता
एक असा हा आपुला नेता।
असतो मते मागण्या पुरता ॥
निवडून जेव्हा तो येता।
शोधीत फिरते त्यास जनता ॥
पांच वर्षे तो दिसत नाही ।
आपुले घर तो भरीत राही ॥
त्याला जनतेचे दूःख ना दिसे ।
गाऱ्हाणी तोंडाने मांडित नसे ॥
एकू त्यास कमी येतसे ।
डोळे त्याचे सदा बंद असे ॥
किती ओरडली जरी जनता ।
निर्लज्यासह भोगी सत्ता ॥
आज मताला पुन्हा तो येता;
घाबरलासे मनात थोडा ।
कोण फेकिल माझ्यावर जोडा
कोण फेकिल माझ्यावर जोडा
- अनंत खोंडे
21 august 2009