परदेशातून आला राक्षस, असा कसा हो भारतात
हुलकावणी देऊन कस्टमला, शिरला हो जनात
गुण, रुप त्याचे ना कळले, या जनतेस भारतात
बुरखा पांघरून आला साळसूद,शिरला तो गर्दीत
म्हणतात आहे भस्मासूर, कोणी म्हणे बकासूर
रोज एक माणूस खातो, नरभक्षक असा आसूर
लपालपीचा खेळ खेळतो, गर्दीत हो याचा वास
नाव त्याचे शोधून काढे," स्वाईन फ्लू" खास
लक्षणे त्याची जाहीर केली,सरकारने हो जनतेस
सर्दी, ताप,खोकला,वांत्या,घसादुखी असतो त्रास
आहे हा संसर्गजन्य, होतो हवेतील विषाणूपासून
दूर रहा गर्दीपासून,टाळा हस्तांदोलन मनापासून
स्वच्छ ठेवा हात,पाय तुमचे,बांधा रुमाल नाकास
कळवा नाव रोग्याचे, जर असेल माहित तुम्हांस
झाली बाधा स्वाईनफ्लू ची,जर तुम्हास वाटले तर
घ्यावे औषध त्वरित, जावून त्या आरोग्यकेंद्रावर
परेशान झाली भारतीय जनता,घाली सांकडे देवास
बकासूराचा वध करण्यास, पाठव लवकर भीमास