सुख

एक मुलगा होता,
असाच एकटा राहणारा.
स्वाताच्या मनाला आणि मनातल्या स्वतला,
एकटक प्रश्न विचारणारा,

सुख म्हणजे काय असते?
सुख कोठे मिळते?
खूप शोध घेतला सुखाचा,
पण बहुदा तो वैरी होता दुख:चा.

नाही मिळाले सुख आणि दुकान सुखाचे,
नाराज होता तो पांघरूण चादर दुख:ची.
आज निरागस माननी तो पुन्हा विचारात आहे,
सुख म्हणजे काय असते?
सुख कोठे मिळते?.....................

प्रश्न त्याचा असा होता की,
उत्तर त्याचे कोणीच देत न्हवते.
त्याला उत्तर मिळत न्हवते,
आणि नाराज त्याचे मन सतत रडत होते.

एका बागेत गेला एके दिवशी तो,
बासूणी एका बकावर गुंतला विचारत तो.
इतक्यात एक लहान मुल रडत होते तिथे,
म्हणत होत आई झोक्यावर बसव मला इथे.

ते मुल उभे होते एका पायावर,
मन होते मात्र तयार झुळायला त्या झोक्यावर.
घाबरली होती जननी त्याची,
पण पाहवत न्हव्ती अवस्था त्या लेकराची.

हाताश त्याचा आईला बघुनी,
पिता मुलाचा पुढे सरसावला.
संभाळून त्या लेकराला,
हळूच झोक्यावर्ती विसावला.

आज हसले ते लेकरू मनापासून खूप,
त्याच्या हसण्या तून जाणवली एक वेगळीच हुरूप.
आई पाहत होती दुरून कशी तरी,
पण भिजल्या डोळ्याने हसत होती खरी.

आज त्याला मिळाले उत्तर त्याच्या प्रश्नाचे,
आहे सुख कुठे तरी.
रूप आहे त्यला,
त्या आईच्या आसवांचे.

आता नाही विचारत तो प्रश्न कोणाला,
आहे उत्तर माहीत त्याला आणि त्याच्या मनाला.
सुख आहे इथे, सुख आहे तिथे,
सुख आहे सगळीकडे.

आणि....... आता ते आहे त्याच्याकडे...!