ती दूर जाताना.........!

चिंब पावसांनी आज, भिजुनी निघालो
डोळ्यातील आसंवाना, वाट करुनी निघालो
वाटेतुनी पुन्हा, पाठी वळूनी पाहिले
पाठमोरी दिशा तिची, आज वाहुनी निघालो...

कसे होते ते आमचे, असे वेडे बहाणे
रक्ताच्या नात्यासाठी, छळी जगीचे शहाणे
नाही होणार भेट आपली, मन माझे मी कोंडले
आपल्याच लोकांसाठी, पाठी तुला मी सोडले...

नाही समजले मन, कसे छळले मी तुला
मी नाही भेटणार, विसरुनी जा तु मला
माझे मन मला, आता समजले मुला
माझ्यासाठीच तो बघ, आता पाऊसही भिजला...

आज पावसामध्ये, मला काही ना मिळाले
होते एक मन माझे, आज ते ही निघाले
पाठमोऱ्या दिशेला, मी पाहत राहीन
नाही येणार तु, पण वाट मी पाहीन...

गेली ती दूर कधी, नाही उमगले मला
उभा असाच पावसात, जसा पाण्याला भिडला
कधी नाही हे विचारले, आता सांग तू मला
उभा कोण पावसात, कोणासाठी हा भिजला....?