मला वाटतेयं......

मला वाटतेयं हे जग, माझ्यापासून लपवतेय काही.
आपलेच हात डोळ्यासमोर धरून, म्हणते बघ दिसते का काही?
आज काही दिसतही नाही, आणि उमगतही नाही.
आणि का कोणास ठाऊक, काही सुचतही नाही.

मिळालेच चार शब्द तर वाटते, उतरवावे ह्या वहीत.
पण नाहीच मिळाले ते, आता कसे धरू मी हे गृहित?
तुमचे आणि माझे नाते, हे असे शब्दापलिकडचे.
जरी मिटले डोळे माझे, तरी नाही हे नाते संपायचे.

मग का धरला हा हात, असा उगाचच डोळ्या समोर.
माहित आहे का तुम्हाला, मी आहे उभा तुमच्याच समोर.
फक्त एक इच्छा आहे माझी, कराल का पूर्ण ती तुम्ही?
निरोप घेण्याआअधी या जगाचा, मला द्याल का ओळख तुम्ही?

ओळखलं नाहीत तरी चालेल, पण आहे एक विनंती.
विसरुनी जा मला तुम्ही, जसा दिसतो मी डोळे उघडल्यावरती.
जग म्हणते आहे असा कसा हा, वेगळा सर्वापरी?
पण नाही मी वेगळा, आहे जग एकसारखेच माझ्यापरी.