रेव्ह पार्टी

सिंहगडच्या पायथ्याशी, जमली होती कार्टी
मजेत आलली होती, त्यांची पाहा रेव्ह पार्टी

तिकीटा शिवाय तेथे, नव्हता  कुणास प्रवेश
तरुण तरुणींचाच होता,फक्त त्यात समावेश

संयोजकाने  फेकले  होते, छान  कसे  जाळे
अडकली  होती त्यात, खूप  धनिकांची बाळे

पाश्चात्य  संगिताचा, चालत  होता जल्लोष
बेभानपणे तरुण,  तरुणी  नाचती  मदहोश

जशी  जशी  वाढे, मैफिलीची  धुंद  ती  रात्र
उत्तेजित  होत  होती, तरुण तरुणींची  गात्रं

पिण्यास  होते  मद्य,  देशी, विदेशी  भरपूर
धंदा  चरसाचाही  चाले,  तेथे  पाहा  पुरेपूर

झिंगलेली मद्यधुंदबाळे,घालती गळ्यात गळे
हरवुनी एकमेकात,चालती नसते त्यांचे चाळे

नसती बंधने कोणावर, वाटेल तुम्हांस खोटे
लुटती स्वर्गसुख  बाळे, मनास  योग्य  वाटे

शुद्धीत  नसती  कोणी, काय काय  करतात
येऊन  तेथे  पोलिस, अटक त्यांना करतात