जगणे

विसरलो बोलणे
      आता आंम्ही
लळा दर्शन
       भक्ती पायी

विसरलो गाय
      आता आंम्ही
डबा दुधावर
      जगण्या पायी

गंध देईना
      आता माती
रुक्ष डांबरी
       रस्त्या पायी

विसरलो सुगंधित
       फुले आता
कृत्रिम गंधित
       अत्तरा पायी

माघे ठेवली
       मुले आंम्ही
बहू भोगण्या
       सुखा पायी

क्षण आपला
       नमिळे आंम्हा
आहे विकला
       पैश्या पायी

जगणे छोटे
       आशा मोठी
लब्ध जगणे
       प्रतिष्ठे पायी

नित्य हासतो
       नित्य जागतो
नित्य भोगतो
       पैश्या पायी

ह्यात पैसा कमावणे सर्वस्वी वाईटच ! , आशा असणे वाईटच , हेही ह्यात गर्भित करावयाचे नाही.  पण! प्रत्येक गोष्ट एकामर्यादे नंतर .........
ह्या सगळ्या खेळात आंम्ही, आंम्ही म्हणून कधी जगणार, किंवा आमच्यासाठी वा आमच्या माणसां साठी कधी जगणार ? हा आशय अभिप्रेत
आहे.