तो मैत्रीचा बोल होता !!!

विचार माझा सांगताना तो मैत्रीचा बोल होता,

त्या भावना व्यक्त करताना तो मैत्रीचा मोल होता..... !

तुझ्याशी खूप बोलताना तो 'मैत्रीचा छंद' होता,

तुला जवळचे करताना तो 'मैत्रीचा गंध' होता.... !

आधार तुझा मागताना तो मैत्रीचा हात होता,

तुझ्यासवे खूप हिंडताना  तो मैत्रीचा प्रांत होता.....!!!!