"व्यसन"

                                                                                

    "व्यसन"

व्यसन सोडण्यासाठी केल्या, कित्येक मी प्रतिज्ञा ।

व्यसन चालू राहू दे, मन करी सतत आज्ञा ॥

व्यसन सोडल्यावर निर्धाराने, दोन चार दिवस जातात ।

घरात मात्र अशांतता सतत, भांडणे होत राहतात ॥

एकही दिवस उणा जात नाही, त्याची आठवण होते ।

सुख झाले वा दुःख, मन त्याचीच ओढ घेते ॥

कल्पना आहे मला ,त्याच्या दुष्परिणामाची।

डॉक्टर पण सांगत असतात, गंभीरता त्याची ॥

क्षणभर टीव्ही बघताना, स्वतःस मी धन्य समजतो ।

थोडे दिवस का होईना, व्यसना पासून दूर राहतो

टीव्ही बघताना मी, इतका तल्लीन होतो ।

तासंतास मी मात्र, चॅनल बदलीत राहतो ॥

एक व्यसन सोडण्यासाठी, मन दुसरीकडे लावतो ।

न कळत मात्र मी,दुसरे "व्यसन जडून घेतो" ॥

अनंत खोंडे.

२६ ऑगस्ट २००९