दिसले झाड मजला औदुंबरचे
असते येथे स्थान श्री दत्ताचे
प्रदक्षिणा घालून त्या झाडास
क्षणभर बसलो टेकून झाडास
दया, क्षमा, शांतीचे ते आगर
असे हा पाहा कृपाळू औदुंबर
मनात कोलाहल खूप उठता
शांत होई याखाली बसता
वंदन करा तुम्ही औदुंबरास
मिटतील सर्व चिंता असल्यास