"रजनीकांत" ची आरती..

सुखकर्ता-दुःखहर्ता च्या धरतीवर, तमिळ सिने रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारा, पण जन्माने मराठी असणाऱ्या रजनीकांत वर सुचलेली विनोदी आरती..

जय देव जय देव जय रजनीकांता

कसलेही पराक्रम करूनी दाखविता 

जय देव जय देव... ॥ध्रु॥

  

बोटी लेऊन विडी, ओठी फेकिली,

ओठांनी लीलया, झेलूनी दाखविली,

थोडी चघळूनी तुम्ही, मग ती पेटविली,

धुराची वर्तुळे काढूनी दाखविली ॥१॥ 

जय देव जय देव...

  

पिस्तुलाने तुम्ही, गोळी चिंबविता

भौमितिक सिद्धांते,   बंदूक चालविता

एकटे आसूने सर्वां, सहजी लोळविता

एवढं सगळं करता, लुंगी न सुटता..!! ॥२॥

जय देव जय देव...

    

टोपी घालायचे तुमचे, कसब अती भारी

गॉगल लावायची, "स्टाईल" ही न्यारी

काळे असूनी कसे, पटविता गोरी?

आम्हासी अनुष्ठावी, मोहिनी जादूभरी ॥३॥

जय देव जय देव...

   

माफी असावी,   नसे ही चेष्टा

सत्य असे हे, नसे ही थट्टा

भल्या भल्यांचा पाडूनी पिट्टा

तमिळ गाजवितो,   आमुचा मरहट्टा ॥४॥

   

जय देव जय देव जय रजनीकांता

कसलेही पराक्रम करूनी दाखविता 

जय देव जय देव...

   

- श्रीयुत पंत