उद्धवा अजब तुझे सरकार
जुलमी सत्ता,गरीब जनता,
महागाईचा भडिमार ..
उद्धवा अजब तुझे सरकार
पाणी घ्यावे लागते विकत,
रेशन धान्य नाही मिळत,
तुटवडा घासलेटचा भासत
जनतेस नाही आधार .....
उद्धवा अजब तुझे सरकार
पैशावाचून मिळत नाही शिक्षण,
पर्सटाईलचे प्रवेशास दडपण,
फतवे निघतात कसे विलक्षण
जनता होई बेजार ......
उद्धवा अजब तुझे सरकार
भेसळ करती पाहा खाद्यपदार्थात
नफा कमवती नकली औषधात
काळा बाजार करती अवयवात
नकली नोटात व्यवहार .....
उद्धवा अजब तुझे सरकार
गर्दी वाढली किती शहरात
वहातुक येत नसे नियंत्रणात
पोलिस मग्न हप्ते वसुलित
अपघाताना नसे आवर.....
उद्धवा अजब तुझे सरकार
न्यायालयेही हात टेकती
म्हणती जरी देव आवरती
बदल करण्यास तेही शरमती
अधोगतीचा झाला कहर ....
उद्धवा अजब तुझे सरकार