"चिऊताईचे घरटे"

                              " चिऊताईचे घरटे"

   चिऊताई चिऊताई सारखी तू येते जाते ।    

  काट्याकुट्या आणून सुंदर घरटे तू बांधते ॥

  मऊ करण्या त्यामध्ये कापूस चिंध्या ठेविते ।

  सुरक्षिततेची सर्व काळजी तू घेते ॥

  उबदार त्या घरट्यामध्ये अंडी तू घालते ।

  छान छान पिलांना जन्म तू देते ॥

  चारा तू चोचीतून पिलांना भरविते ।

  चिवचिवाटांनी त्यांच्या घर फूलून जाते॥

  कोण तुला हे सारे सांग शिकविते? ।

  पिलांचे पोषण करणे कसे तुला जमते? ।।

  सतत चारापाणी आणून नाही थकत कशी? ।

  थांबला तो संपला जणू ही, "शिकवण आम्हा देशी" ॥

अनंत खोंडे.

२९ऑगस्ट२००९.