माझी कविता

मातीच्या कणांत,

कणसाच्या दाण्यात,

स्वप्न माझी दाटली.

मेघांच्या पाण्यात,

वायुच्या वेगात,

ज्योत माझी पेटली.

सागर लाटात,

कपारी घाटात,

वाट माझी भेटली.

वेळूच्या बनात,

चिंचेच्या पानातं,

कविता माझी उमटली.