रोज नवीन पहाट व्हावी
नित्य फुले दवात न्हावी
हलकेच मारवा गुणगुणता
तुझीच सय दाटून यावी
रोज सन्थ श्रावणधार झरावी
काया अवघी चिम्ब भिजावी
पाऊसगाणी मनात जुळता
याद तुझी बहरून यावी
रोज नवीन मैफल सजावी
तुला पाहता कळी खुलावी
सुन्या सुन्या मैफ़ीलीत माझ्या
तुझ्या चान्दण्याची बरसात व्हावी
सुप्रिया