सूर उमटले ओठान्वरती

सूर उमटले ओठान्वरती
जाग अबोल क्षितिजावरती
तू येताच रे घन:शामा
शतकिरणे प्रकाशून येती

यमुनेचा नीळा डोह
गुपित माझे सान्गतो
तुझ्या चाहुलीने कान्ह्या
सूरपक्षी बघ बहरतो

तुझ्याचसाठी रे कृष्णा
जगाची लाज मी सोडली
तव साथीची आस आता
अवघ्या मनातून झिरपली

शब्दान्चे मोती वेचून
स्तुतीसुमने मी गुम्फिली
तव आठवान्चे नित्य सोहळे
राधा नामगजरात दन्गली

सुप्रिया