पुन्हा पाच वर्षांनी

निवडणूकीच्या तारखा जेव्हां जाहीर होतील

तेव्हा .................

नेत्यांच्या गाठीभेटी , पक्षांची मोर्चा बांधणी

दिव्यांच्या गाड्यांचे ताफे , रस्त्यांरस्त्यांवरून धावतात

मोटार कसी असते माहीत नसलेल्या गावात.

तिकीट वाटप करताना , राखीव जागा आप्तांसाठी

काही थोड्या देऊ , जे लढतात जनतेसाठी.

पुन्हा वाहतील नवे वारे , नव्या दिशांनी

जुनेच चेहरे , पण नव्या जोमाने

घेऊन येतील .............

नवी आश्वासने , नव्या मागण्या , नवे लेबल पार्टीचे.

तितकीच ठोकतील नव्या जोमाने , गरिबी हटावाची भाषणे

निदान...............

बेकारांना काम देण्याची आश्वासने

पुन्हा येतील पाच वर्षांनी , त्याच त्या नव्या घोषणा

नवे विचार नव्या उमेदीनं , सर्व काही नवे नवे........... 

----- साहेबराव खानसोळे.