"चिकाटी"

                 "चिकाटी"

प्रयत्न करणाऱ्याची जीवनी कधी न होई हार ।

कितीही उठो सागरात लहरी नाव त्याची लागेल पार ॥ध्रु ॥

इवलीशी मुंगी दाणा घेऊन भिंतीवर चढते ।

चढता चढता कितीदा तरी ती खाली पडते ॥

परी शेवटी विश्वास तिचा मनी साहस भरते ।

चढून पडणे पडून चढणे सतत तिचे चालू राहते ॥

अंती ही तिची मेहनत जात नाही बेकार ॥ध्रु॥१॥

डुबकी सागरात दर्यावर्ती सतत लावीत असतो ।

जाऊन जाऊन तळाशी रिकाम्या हाती परत येतो ॥

मिळत नाही सहज मोती त्याला खोल पाण्यात ।

परंतू वाढतो उत्साह पुन्हा पुन्हा पाण्यात जाण्यात ॥

मूठ रिती नसते त्याची वर येता वारंवार ॥ध्रु॥२॥

अपयश हे आव्हान आहे त्याचा स्वीकार करा ।

काय उणीव राहिली हे शोधा नि त्यात सुधार करा ॥

जोवर यश न मिळे तोवर जागे राहून त्याग करा ।

संघर्षाचे मैदान सोडून पलायन तुम्ही न करा ॥

काही केल्याशिवाय जीवनात होत नाही" जयजयकार" ॥ध्रु॥३॥

अनंत खोंडे

३१ऑग.२००९.      

टीपः- ही कविता हरिवंशराय बच्चन किंवा सुर्यकांत त्रिपाठी यांचा हिंदी कवितेच्या प्रेरणेतून सुचली