जीवन आहे खरे, अगम्य कोडे
रहस्य त्याचे कधीच न उलगडे
असती जीवनात अनेक रंगछटा
समजण्या मानव करी आटापिटा
कुणास प्रेमाने भरलेले ते वाटे
दिसतात कुणास दुःखाचे काटे
कुणी अनुभवती नाजुक जीवन
संघर्ष करती कुणी, आजीवन
आसक्ती वाटे हो कुणास प्यारी
विरक्तीची ओढ, कुणास न्यारी
गाठोडे बांधती, कुणी पुण्याचे
ओझे वाहती, कुणी पापाचे
कुणी संपवती, मध्येच प्रवास
कंटाळती कुणी ह्या जीवनास
कळले नाही, कुणास जीवन
आहे पाप पुण्याचे, ते मंथन