भेट घ्यावया तुझि
बेचैन मी अधिर मी ॥
अविट तुझ्या संगे
कधि नव्हते सुखा उणे ।
अनवरत तुझ्यासवे
नेणिवेत रंगणे।
जागवु या त्या पुन्हा
सुरम्य सुखद आठवणी ॥१॥
लाभले होते मला
थोडेसे क्षण भाग्ये ।
मस्तक माझे तुझ्या
वक्षावरि शांतले ।
श्रवण पिऊ देत पुन्हा
ती हृदयातिल गाणी ॥२॥
देखुनि सवतीने त्या
आम्हा गाफील क्षणी ।
तोडुनी ते दिव्य बंध
धाडिले दिगंतरी ।
चल समजावु तिला
अपुलि भावना मनी ॥३॥
दाटे अंधार घोर
भिववितो क्षणोक्षणी ।
असह्य वाटतो विरह
उबगले अता अति ।
प्राणज्योत माझी
समर्पिन तंव पदी ॥४॥
भेट घ्यावया तुझि
बेचैन मी अधिर मी ॥