रक्तदान

कळले मजला एका रक्तदान शिबीरात
महत्त्व किती रक्ताचे आपुल्या जीवनात

नसतो भेदभाव कोणाच्याही रक्तात
मूकबधीर, अपंग, अपवाद नसतात

असते रक्तधन, प्रत्येकाकडे  अक्षय
खर्च केल्यास, भरते  पुन्हा  निश्चय

समजावे मानवाने हेची आहे वरदान
द्यावे आजाऱ्यास संजिवनाने जीवदान

केले आज तुम्ही रक्तदान दुसऱ्यास
पडतील उपयोगी ते नक्की तुम्हांस

दवडू नका, उगाच वेळ तो आपुला
कारणी लावा रक्तदानाने,  चांगला

दानात असे हो श्रेष्ठ दान, रक्तदान
करुनी रक्तदान व्हा तुम्ही पुण्यवान