वांग्याचे दह्यातले भरित

  • २ वांगी (भरिताची मोठी ), कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा.
  • दाण्याचे कूट.
  • साखर , मीठ.
१० मिनिटे

१) वांगी भाजून गरमच झाकून ठेवावीत. १० मिनिटांनी सोलावीत. (असे केल्यास पटकन सोलली जातात. )

२) वांगी कुस्करून त्यात दाण्याचे कूट, साखर, मीठ, बारिक चिरलेला कांदा-कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा घालून कालवून घ्यावे.

हे असेच खाल्ले तरी छान लागते.

वाटल्यास वरून तूप + जिरे / नेहमीची तेलाची फोडणी द्यावी.

वांगी नीट बारिक कुस्करून घ्यावीत.

सौ. आई