एक क्षण पुरे प्रेमाचा

एक क्षण पुरे प्रेमाचा
तुझ्या माझ्या विश्वासातील
नाती जपण्याचा

एक क्षण पुरे प्रेमाचा
नाती जपत
संकटं झेलण्याचा

एक क्षण पुरे प्रेमाचा
आयुष्य दु:खांनी
भरलेलं असलं तरीं
बाकी समाधान असल्याचा

पुष्पलता करंगुटकर